Hours : Mon To Fri - 10AM - 08PM

समाजसेवा

समाजातील प्रत्येक घटकाला समाजसेवेची आवड निर्माण करणे व प्रेरित करणे यासाठी समाजातील सधन व सर्वसामान्य जनतेकडून वस्तु व देणग्या स्विकारुन त्यांचे गरजूंना वाटप करणे. तसेच समाजामध्ये सर्वधर्मसमभाव, भाईचारा, धर्मनिरपेक्षता, समता, बंधूभाव, शांतता, सामंजस्य, परस्पर सहकार्य, राष्ट्रहित, राष्ट्रप्रेम इ. मुल्यांची व भावनांची जोपासना करण्यासाठी संस्थेतर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक, सुसंपन्न समाज निर्मितीसाठी प्रयत्न केला जाईल. तुळजाभवानी मातेचा सार्वजनिक उत्सव साजरी करणे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहिहंडी, शिवजयंती, दत्तजयंती, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, महाराष्ट्र दिन व इतर सण उत्सव साजरी करणे. तसेच थोर, राष्ट्रीय नेत्यांच्या जयंती या निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, वादळ व जळीत इ. आपदग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली जाईल. संस्थेतर्फे महिला व बालक आश्रम, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, वधू-वर सुचक केंद्र, वधू-वर मेळावे व सामुदायिक विवाह या सारखे उपक्रम हाती घेतले जातील. सदर ट्रस्टमार्फत स्ट्रीट लाईट, पाणी तसेच इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

Read More

वैदयकिय व आरोग्य

सर्व प्रकारचे हॉस्पिटल उभारणी, तसेच वैदयकिय महाविदयालये उभारणे. संस्थेतर्फे नियमितपणे मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाईल. आजारी व गरजु रुग्णांना आवश्यक असणारी सेवा, औषधे व रुग्णसाहित्य उपलब्ध करुन दिले जाईल. असाध्य रोगांच्या उपचारासाठी गरजूंना आर्थिक व वैदयकिय मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल व रक्तदान शिबिरे आयोजित केली जातील. समाजामध्ये कुटुंब नियोजन, एड्स, नेत्रदान, रक्तदान, अवयव दान इ. बाबत जनजागृती केली जाईल. शक्य झाल्यास संस्थेतर्फे रुग्णवाहिका, रक्तपेढी, नेत्रपेढी सुरु केली जाईल.

Read More

महिला विषयक

महिलांना आर्थिक साक्षर बनवून त्यांना उत्पन्नांचा स्त्रोत मिळवून देणे. महिलांचा दैनंदिन जडणघडणीचा स्तर उंचावणे. महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी काम करणे. महिलांना त्यांच्या कलांना वाव मिळवून देण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे. शासकीय योजना महिलांपर्यंत पोहोचवणे. महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करणे. समाजातील सर्व जाती-धर्मातील महिलांना खऱ्या अर्थाने स्वावलंबी व सबला बनविणे, त्यांना अर्थजनासाठी गृहउदयोगाचे प्रशिक्षण दिले जाईल. उदाः शिवणकाम, भरातकाम, विविध कला- कुसरींच्या कला, पाककला, लोणची, पापड, मसाले, मेणबत्ती, अगरबत्ती, खड्डु, पेपरप्लेट, द्रोण तयार करणे. त्याचबरोबर महिलांसाठी ब्युटीपार्लर कोर्सेस, फॅशन डिझायनिंग कोर्सेस सुरु केले जातील. तसेच महिलांच्या बचतगटांना प्रशिक्षण देणे, संस्थेतर्फे विविध सेवाउदयोग, लघुउदयोग, कृषीपुरक उदयोगाचे प्रशिक्षण व तंत्रशिक्षण दिले जाईल. उदाः इलेक्ट्रिक - इलेक्ट्रॉनिक उपकरणांची जुळवणी, संगणक दुरुस्ती, फळप्रक्रिया उदयोग, अन्न प्रक्रिया उदयोग, शालेय पोषण आहार वितरण, दुग्ध व्यवसाय, रोपवाटीका, पॅकेजिंग इ. प्रशिक्षणाबरोबर महिलांना स्वतःचा उदयोग-व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य केले जाईल. स्त्री आधार केंद्र सुरू केले जाईल.

Read More

उदयोग विषयक

समाजातील तरूणांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेतर्फे औदयोगिक प्रशिक्षण केंद्रे सुरु केले जातील व त्यांना अशा केंद्रांमधून रोजगाराभिमुख, व्यावसायाभिमुख प्रशिक्षण दिले जाईल. तरूणांमध्ये व्यावसायिक व उदयोजक प्रवृत्ती वृद्धींगत होण्यासाठी, त्यांना स्वावलंबी व उदयोगक्षम बनविण्यासाठी यशस्वी उदयोजकांचे मार्गदर्शनपर शिबिरे आयोजित केली जातील. तरूणांना स्वतःचा व्यवसाय-उदयोग सुरू करण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान, शिक्षण, प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाईल. संस्थेतर्फे तळागाळातील तरूणांना विविध शासकिय योजनांची माहिती दिली जाईल व सखोल मार्गदर्शन केले जाईल आणि प्रोत्साहन दिले जाईल. राष्ट्रीयकृत बँका, रेल्वे भरती इ. रोजगांच्या संधींबाबत माहिती दिली जाईल व मार्गदर्शन केले जाईल. त्यासंबंधीच्या परिक्षांची तयारी करुन घेतली जाईल. त्यासाठी एम.पी.एस.सी आणि यु.पी.एस.सी. कोचिंग क्लासेस चालविले जातील व त्यांना मार्गदर्शन केले जाईल.

Read More

Welcome To Fortune City

Come Together As a Community

Fortune City Society is a Private Social Networking Platform which helps connect Neighbors. Be it Important Discussions regarding the Community, or asking Neighbors for Advice, or staying updated regarding all Activities in the Community; Staying Connected makes Community Living not only Fun, but a lot more Secure!

These are the Owners elected to be in the Managing Committee. They spend scarce personal time in placing operational processes, evaluating expense decisions, executing projects for common welfare without looking for selfish gains.
image

Interested for Donation?

+91- 9922216569